
वेंगुर्ला : वैभव होडावडेकर मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी तुळस व भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला आयोजित भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक १९ व शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय भव्य संगीत निमंत्रित भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच या सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष चषक २०२५ या नावाने घेण्यात येणारी ही भव्य भजन स्पर्धा तुळस येथील उत्सव हॉल येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील नामवंत बुवा सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख २१ हजार व आकर्षक प्रदेशाध्यक्ष चषक, व्दितीय पारितोषिक रोख १५ हजार, तृतीय पारितोषिक रोख ११ हजार, उत्तेकजनार्थ प्रथम रोख ७ हजार, उत्तेतजनार्थ व्दितीय रोख ५ हजार, उत्तेनजनार्थ तृतीय रोख ३ हजार व सर्वांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज वादक, शितबद्ध संघ, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट गजर अशी वैयक्तिक रोख पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच अचूक तीन नंबर सांगणा-या प्रथम, द्वितीय ,तृतीय भाग्यवान स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांस आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भजन रसिकांसाठी ही स्पर्धा कोकणसाद लाईव्ह चॅनल वर थेट लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. तरी भजन रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.