
वेंगुर्ला : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी असतील त्यांनी जनता दरबारच्या अगोदर आज किंवा उद्या सकाळी आपल्या समस्यांची निवेदने वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालयात आणून द्यावीत. जेणेकरून पालकमंत्री यांच्याशी समस्यांवर संवाद साधणे व मांडणी करणे सोपे जाईल असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पु परब यांनी केले आहे.










