संदीप गावडे यांच्यामार्फत अणसूरला शैक्षणिक साहित्य वाटप

Edited by: दिपेश परब
Published on: August 29, 2025 15:52 PM
views 208  views

वेंगुर्ला : अणसूर पाल हायस्कुल व गावातील प्राथमिक शाळा येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण याच्या संकल्पनेतू जिल्हा उपाध्यक्ष संदीप एकनाथ गावडे यांच्यामार्फत शैक्षणीक साहित्य वह्या वाटप करण्यात आले. संदीप गावडे गेली आठ वर्षे विदयार्थ्यांना वह्या वाटप करत आहेत. आत्मविश्वास, स्वातंत्र्य एकाग्रता आणि अथक परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे. यापुढेही हे आपले कार्य अविरत चालू राहील असे यावेळी गावडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप गावडे यांचा भाजपा आणि अणसूर ग्रामपंचायत च्या वतीने आनंद उर्फ बिटू  गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती पंकज पेडणेकर यांचाही सत्कार वामन गावडे याच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे मुख्यध्यापक राजेश घाटवळ, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, वामन गावडे, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, किसान मोर्चा सदस्य आनंद ( बिटू )गावडे, शिक्षिक, शिक्षिका आदी उपस्थित होते. कार्यक्रमा शेवटी सरपंच सत्यविजय गावडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि संदीप एकनाथ गावडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन तुमच्या सारखे समाजसेवेचे व्रत घेऊन असंख्य कार्यकर्ते व्हावे. असे सांगितले.