वेंगुर्ल्यात विशाल परब यांचा झंझावती दौरा

घरघुती गणेशांचे घेतले दर्शन
Edited by: दिपेश परब
Published on: August 28, 2025 17:06 PM
views 215  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून घरोघरी गणरायाचे पूजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेतले.  परब यांनी यावेळी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, भाजप पदाधिकारी विजय रेडकर, मूर्तिकार शेखर कुंभार यांच्यासाहित काँगेसचे नेते विलास गावडे, वेंगुर्ले येथील परब कुटुंबीय व विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांच्या घरी भेट देत श्रींचे दर्शन घेतले.