
वेंगुर्ले : हर घर तिरंगा अभियानांतर्गत अणसुर ग्रामपंचायतच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी अंगणवाडी च्या मुलांची घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक देविका प्रमोद देवूलकर (जिजाऊ), द्वितीय क्रमांक स्वामीराज सुनील गावडे (छत्रपती शिवाजी महाराज), तृतीय क्रमांक हितिका आनंद गावडे (भारत माता) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुष्का आनंद राणे, द्वितीय क्रमांक रुचिता गजानन गावडे, तृतीय क्रमांक मानसी रामचंद्र गावडे, उत्तेजनार्थ अन्नपूर्णा बाबुराव गावडे या सर्वाना आकर्षक बक्षीस देऊन ग्रामपंचायत च्या वतीने गौरविण्यात आले.