शिवसेना पक्षाची ध्येय, धोरणे तळागळात जनतेपर्यंत पोचवा : सचिन वालावलकर

शिवसेनेची मासिक सभा संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2025 20:05 PM
views 21  views

वेंगुर्ले : प्रत्येक तळागळातील कार्यकर्ता दीपक केसरकर यांच्या प्रेमापोटी काम करत आहे. गावागावात विकास कामे झाली पाहिजेत यासाठी आमदार केसरकर सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी तळागाळात काम करत असताना प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचा. सामाजिक बांधिलकी म्हणून दिवसातील एक तास तरी नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्या. पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोचवा. सध्या जनतेला भेडसावत असणारे विजेचे प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी सत्यताने पालकमंत्री, आमदार शासन स्तरावर प्रयत्न करत आहेत. भूमिगत विजवाहिन्या करण्याचे काम करू आहे. हे सर्व जनतेपर्यंत पोचवा असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले. 

येथील सप्तसागर अपार्टमेंट मधील शिवसेनेच्या कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मासिक सभेत सचिन वालावलकर बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, महिला उपजिल्हा संघटिका शीतल साळगावकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, कोचरे सरपंच योगेश तेली, विभाग प्रमुख संजय परब, मितेश परब, नयन पेडणेकर, अमित गावडे, युवासेना शहर सचिव उमेश आरोलकर, तालुका सरचिटणीस संजय गावडे, उपतालुका प्रमुख देवा कांबळी यांच्यासहित शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच दहावी व बारावी प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोमवारी १८ रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर म्हणाले, येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी गावागावात आपली ताकद दाखवून द्यावी. प्रत्येक गावात आमदार केसरकर यांच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत ती जनतेपर्यंत पोचवा. उर्वरित किंवा अपूर्ण कामांचा आढावा घ्या. आता अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.