अणसुर पाल हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची सायकल रॅली

Edited by: दिपेश परब
Published on: August 11, 2025 20:11 PM
views 170  views

वेंगुर्ला :  हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत अणसुर पाल हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी आज ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण गावातून हर घर तिरंगा, हर घर स्वछता, हर घर जल चा नारा देत सायकल रॅली काढली. यावेळी अणसुर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य वामन गावडे, सुधाकर गावडे, संयमी गावडे, सीमा गावडे, प्रज्ञा गावडे भाजपा पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, बूथ प्रमुख, वामन गावडे, किसान मोर्चा सदस्य आनंद (बिट्टू ) गावडे, प्रभाकर गावडे हायस्कुल मुख्याध्यापक राजेश घाटवळकर, ठाकर सर, शिक्षिका प्रीती परब, सातार्डेकर मॅडम, परब मॅडम, हायस्कुल कर्मचारी, शिपाई, पूर्ण प्राथमिक शाळा परब मॅडम, अंगणवाडी वाडी सेविका भक्ती गावडे, मदतनीस गावडे मॅडम इत्यादी उपस्थित होते.

ही रॅली अणसुर पाल हायस्कुल येथून चालू होऊन संपूर्ण गावातून ग्रामपंचायत येथे समाप्ती करण्यात आली. त्यानंतर सायकल रॅली मध्ये भाग घेतलेल्या सर्व विध्यार्थी आणि शिक्षक यांचे ग्रामपंचायत व भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्व उपस्थित विध्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत समिती यांचे सरपंच सत्यविजय गावडे यांनी आभार मानले.

या उपक्रमा अंतर्गत अणसुर पाल हायस्कुल च्या विद्यार्थ्यानी सरपंच व भाजप पदाधिकारी याना तिरंग्याच्या रंगा मध्ये रख्या बनवून व रख्या बांधून एक अनोखी भेट दिली.