वेगुर्लेत अत्याधुनिक कँन्सर व्हँनच्या माध्यमातून २६८ नागरिकांची तपासणी

Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2025 21:03 PM
views 17  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रूग्णांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २६८ रुग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी, स्क्रिनिंग आणि समुपदेशन करण्यात आले.

येथील उपजिल्हा रूगणालय वेंगुर्ले येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते फित कापून तर शिवसेना जिल्हासमन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांत भाजपाचे तालुकाध्यक्ष विष्णु परब, ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे, डॉ. संजीव लिंगवत, रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद बोवलेकर, वरीष्ट अधिकारी राजेश घाटवळ, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष अॅङ प्रथमेश नाईक, किरण कुबल, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, कार्मिस आल्मेडा, किरण खानोलकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अपर्णा बोधलेकर, वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब आदींचा समावेश होता.

या अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची मौखिक, गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी निदान करण्यर्थ्यासाठी आलेल्या पथकांत डॉ. एच. के मणेर, डॉ. गणेश मर्डेकर, ऋचा प्रभु योगेश कांबळे, राजेश पारधी, संतोष खानविलकर, रजत जोशी, नेहा पडते, शिल्पा दळवी, महादेव हिंगले, सुनिल धोपावकर यांच्या माध्यमातून रूग्णांची तपासणी करण्यात आली. उपजिर्लहा रूग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक डॉ. संदिप सावंत, डॉ. निखिल बोड्डावार, परीसेविका श्रीनिधी घाटवळ, डॉ. अमोल गबाळे, डॉ. शुभंम धारगळकर, डॉ. किरण कुंटे, डॉ. निखिला बेडावार, डॉ. सत्यम आगलावे, फार्मसी अधिकारी दिनेश राणे, प -राजक्ता मोरजकर, मंगल पवार, प्रियांका कारीवडेकर, समिक्षा पारकर, अस्मिता वराडकर, फार्मसी अधिकारी अनुजा मोरे यासह अन्य स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉ. सुप्रिया रावळ, डॉ. महोदव मुंडे, श्याम चव्हाण, संजना मोचेमाडकर, तनुश्री नाईक यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.