
वेंगुर्ले : तालुक्यातील वजराट शाळा नंबर १ शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा वजराट पॅटर्नने चौकार मारला असून ग्रामीण गुणवत्तेचा वजराट पॅटर्न पुन्हा जोमात आला आहे. शाळा वजराट नंबर १ चे चार विद्यार्थी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले आहेत.
कु. स्वरधा अरविंद झेंडे हिने २५४ गुण घेऊन राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात पाचवी,तालुक्यात द्वितीय आली आहे. नीरज शेखर परब हा २५२ गुण घेऊन राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात नववा व तालुक्यात तृतीय आला. माही राजाराम घोंगे हा २३० गुण मिळवून, पियुषा मिलिंद घोणे २२४ गुण मिळवून राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्ती मिळवली आहे. तसेच चैतन्य प्रेमानंद सावंत भोसले याने २०४ गुण, गुरुनाथ लवु पेडणेकर याने २०० गुण, यश नरेश पालयेकर याने १८० गुण मिळवून हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व शिष्यवृत्तीधारक मुलांचे तसेच उत्तीर्ण मुलांचे आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या मुलांना शाळेतील शिक्षिका रुपाली पाटील, शिल्पा जाभूळकर, मुख्याध्यापक संजय परब , वर्गशिक्षक तेजस बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. माजी केंद्रप्रमुख लवू चव्हाण तसेच विद्यमान केंद्रप्रमुख विठ्ठल तुळसकर यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष शेखर परब, निकिता सावंत, लक्ष्मण कांदे, जान्हवी कांदे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक संघ सदस्य यांनी अभिनंदन केले. गावच्या सरपंच अनन्या पुराणिक, उपसरपंच श्री.पेडणेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.