LIVE UPDATES

अणसुर पाल विकास मंडळ मुंबई यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: दिपेश परब
Published on: June 29, 2025 20:04 PM
views 92  views

वेंगुर्ले : अणसुर पाल विकास मंडळ मुंबई यांच्या मार्फत अणसुर- पाल हायस्कूल अणसुरच्या एसएससी मार्च २०२५ यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे प्रसिद्ध उद्योजक विलास हरमलकर, वेंगुर्ला रोटरी क्लब चे अध्यक्ष आनंद बोवलेकर उपस्थित होते.  सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अणसुर सरपंच सत्यविजय गावडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना तुम्ही यशस्वी होण्यामागे तुमचे आईवडील, शाळेतील गुरुजन त्यांचे ऋण तुमच्यावर आहेत आणि हे ऋण फेडायचे असतील तर या पुढील जीवनात यशाचे शिखर गाठून यशस्वी व्हा, आणि आईवडील, गुरुजन यांचे ऋण फेडा असे सांगितले.

या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, दीपक गावडे, सुरेश गावडे, गुंडू नाईक, विलास हरमलकर, आनंद बोवलेकर, सामाजिक व किसान मोर्चा सदस्य आनंद जयवंत गावडे, सदस्य सीमा गावडे, प्रभाकर गावडे, दीपक अंकुश गावडे, अनंत मांजरेकर, गुरु बर्वे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकर सर, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेश घाटवळकर यांनी केले.