
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. मा. श्री. वसंतरावजी नाईक यांचे जयंतीनिमित्त १ जुलै २०२५ रोजी अणसूर-पाल हायस्कूल, अणसूर येथील सभागृहात कृषि दिन कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे. सदर कार्यक्रमास प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सदर दिवशी अणसूर-पाल हायस्कूलच्या आवारात हळद लागवड प्रात्यक्षिक, वृक्षारोपण इ. कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. पाटकर यांनी केले आहे.