
वेंगुर्ले : अणसूर गावातील विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे ३२ लाखाच्या या कामांचा भूमीपूजन आणि उदघाटन समारंभ जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी आणि शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर याच्या हस्ते पार पडला.
अणसूर मध्ये मंजूर झालेल्या कामांमध्ये वेताळेश्वर मंदिर ते धरमगावडे बस टॉप रस्ता खडीकरण डांबरी करण करणे ४ लाख रुपये, देऊळवाडी स्मशानभूमी बांधणे सुशोभीकरण करणे ८ लाख रुपये, अणसूर धरमगावडे गावडे वाडी ते गोबराचे टेम्ब रस्ता खडीकरण डांबरी करण करणे १० लाख रुपये आणि श्री देव काळोबा मंदिर रस्ता खडीकरण डांबरी करण करणे १० लाख रुपये यांचा समावेश आहे. भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाला सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, भाजप सरपंच संघटना अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, भाजप कार्यकर्ते बिटू गावडे, प्रकाश गावडे, प्रभाकर गावडे, बाबा गावडे, रमाकांत गावडे, बाळा गावडे, संदेश गावडे, मंगेश गावडे, सिद्धू गावडे, भास्कर शंभु गावडे, मानकरी चंद्रकांत गावडे, गोपी गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा गावडे, सीमा गावडे, साक्षी गावडे, सुधाकर गावडे, शिवसेना शाखाप्रमुख शैलेश गावडे, संयमी गावडे आणि सर्व भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आभार मानले.