
वेंगुर्ले : वायंगणी माळरानावतील सीमेवर एक मृतदेह कुणीतरी अज्ञातांनी खड्डा खोदून पुरला अशी माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी टीमसह घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता सदर ठिकाणी खड्डा खणून पुरलेल्या खुणा दिसून आल्या मात्र तो खड्डा पोलिसांनी उखरून पाहिले असता त्या खड्यात मेलेला बकरा पुरलेला आढळून आला. त्यामुळे निश्र्वास सुटला. दरम्यान या पुरलेल्या बकऱ्याच्या शेजारी केळी, पिंजर आदी वस्तू आढळून आल्याने त्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
आज सोमवारी ७ ऑक्टोबर दुपारी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दूरध्वनीवर एका नागरिकाने वायंगणी माळरानावर कोणीतरी अज्ञातांनी खड्डा करून मृतदेह पुरला अशी माहिती दिली. या माहितीवरून वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी काही वेळापूर्वी एक खड्डा खोदून त्यात काहीतरी पुरून ठेवल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तो खड्डा खोदून पाहिले तर खड्ड्यामध्ये मृतदेह होता पण तो बकऱ्याचा. यावेळी पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
परिसरातील एकाने आपल्याकडील मेलेला बकरा पुरला असल्याचे समोर आले आहे. मात्र यामागे नेमके काय देव-देवसकी तर नाही ना. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.