
वेंगुर्ले : वायंगणी समुद्र किनाऱ्यावर कासव विणीच्या हंगामात हलकी नं.१ मध्ये संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यातून बाहेर पडलेली कासवाची ९१ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. कासवमित्र सुहास तोरस्कर यांनी वनविभागाला कल्पना देत त्यांना जीवदान दिले.
यावर्षी तोरसकर यांनी वायंगणी किनाऱ्यावर समुद्री कासवांच्या अंड्यांना संरक्षित करून १० हजार कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडले. वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर कासव विणीच्या शेवटच्या हंगामात २८ व ३० एप्रिल रोजी ऑलिव्ह रिडले कासवाने ठेवलेल्या दोन घरट्यातून ही ९१ पिल्ले बाहेर निघाली होती. यावेळी कासवमित्र सुहास तोरसकर, ऑस्ट्रेलियातील पर्यटक, आनंद रासम, राधाकृष्ण पेडणेकर, योगेश वारंग, प्रदीप परब, राहुल मांजरेकर, प्रकाश मांजरेकर, सदानंद कोठावळे, सुरज तोरस्कर, भालचंद्र तोरस्कर, हॅचरी ग्रुप यासह ग्रामस्थ उपस्थित होते.