वेंगुर्ले व्यापारी संघाच्यावतीने नूतन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत

Edited by: दिपेश परब
Published on: April 08, 2025 18:02 PM
views 369  views

वेंगुर्ले  : वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी पदी हेमंत किरूळकर हे नुकतेच रुजू झाले. यानिमित्त वेंगुर्ले तालुका व्यापारी संघ व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्या वतीने आज सोमवारी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, उपाध्यक्ष राजू पांगम, माजी नगरसेवक अभिनव मांजरेकर, व्यापारी संघाचे सदस्य बबन नार्वेकर, संजय तानावडे, अजित कनयाळकर, राकेश सापळे, डेलीन डिसोजा, माजी उपनगराध्यक्ष सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम मुख्याधिकारी यांनी रामेश्वर देवस्थान ची भेट घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी कालावधीत शहरातील विकास कामासाठी व्यापारी संघाचे व आपले पूर्ण सहकार्य राहील, असे यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे व विभा खानोलकर यांनी सांगितले.