
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.४१ टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडीची शमिता प्रशांत तळवणेकर या विद्यार्थिनीने ९९ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तालुक्यातील १९ पैकी १५ हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. वेंगुर्ले तालुक्यातून एकूण ६७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९९.४१ टक्के एवढा लागला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पहिले पाच मानकरी
१) शमिता प्रशांत तळवणेकर हिने ९९ टक्के - रेडी पार्वती
२) रिया संदिप देसाई हिने ९८.८० टक्के - वेंगुर्ला हायस्कूल
३) दर्शन सुंदर सामंत याने ९५.८० टक्के - अण्णासाहेब देसाई परूळे
४) ऋतुराज मकरंद कोचरेकर याने ९५.६० टक्के - रेडी पार्वती
४) साईश संदिप केरकर याने ९५.६० टक्के - वेतोरे
५) संचिता विजय आंबेरकर हिने ९५.४० टक्के - सिधुदुर्ग विद्यानिकेतन
५) वेदिका मलजी राऊळ हिने ९५.४० टक्के - स.का.पाटील केळुस
५) समिक्षा सुनिल जाधव हिने ९५.४० टक्के - चमणकर हायस्कूल, आडेली
६) प्रणिता प्रभाकर मोंडकर हिने ९५.२० टक्के - सरस्वती टांक
७) दिया ज्ञानेश्वर केळजी हिने ९५ टक्के - सिधुदुर्ग विद्यानिकेतन
८) स्नेथ आशिष परेरा याने ९४.६० टक्के - रेडी पार्वती
९) नुतन रमेश आमडोसकर हिने ९४.२० टक्के - अण्णासाहेब देसाई परूळे
१०) सानिका दिपक पालव हिने ९३.८० टक्के - वेंगुर्ला हायस्कूल
११) विष्णू चंद्रकांत सावंत यांनी ९३.८० टक्के - वेंगुर्ला हायस्कूल
शिवाजी हायस्कूल तुळसचा निकाल ९६.५५ टक्के
शिवाजी हायस्कूल तुळसमधून २९ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९६.५५ टक्के लागला. या हायस्कूलमधून सुरूची संदिप मराठे हिने ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम, मनिष नारायण नाईक ९२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर दिशा गणपत परब हिने ९०.६० टक्केगुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
न्यू इंग्लिश स्कूल मातोंडचा निकाल १०० टक्के
न्यू इंग्लिश स्कूल मातोंड हायस्कूलमधून एकूण २० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. या हायस्कूलमधून स्नेहा कृष्णा जाधव हिने ९३.४० टक्के गुण मिळवून प्रथम, हितेश गणपत सावळ याने ८९ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर साक्षी काशिराम केदार हिने ८७.३० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडीचा निकाल १०० टक्के
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडीमधून ३४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयामधून शमिता प्रशांत तळवणेकर ९९ टक्के गुण मिळवून प्रथम, ऋतुराज मकरंद कोचरेकर याने ९५.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर स्नेथ आशिष परेरा याने ९४.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के
या विद्यालयातून एकूण ३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयातून संचिता विजय आंबेरकर हिने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम, दिया ज्ञानेश्वर केळजी हिने ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर, भावी प्रसाद मराठे हिने ९१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
रा. कृ. पाटकर हायस्कूलचा निकाल १०० टक्के
रा. कृ. पाटकर हायस्कूलमधून ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. या हायस्कूलमधून नवनित आत्माराम मठकर ८९.८० टक्के गुण मिळवून प्रथम, प्रसन्न गोपाळ दाभोलकर याने ८८.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर काशिनाथ सुधिर मालवणकर याने ८६.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
सरस्वती विद्यालय आरवलीचा निकाल १०० टक्के
सरस्वती विद्यालय आरवलीमधून १३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयातून प्रणिता प्रभाकर मोंडकर हिने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम, दिप्ती तिमाजी गवस्कर हिने ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर प्राची संतोष कावळे हिने ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडाचा निकाल १०० टक्के
अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडामधून ६६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातून अंतरा शैलेश पाटलेकर हिने ९३.४० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय श्रेया किरण मुंडशी हिने ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर मनिष महादेव फेंद्रे याने ९२.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
माऊली विद्यामंदिर रेडी हायस्कूलचा निकाल १०० टक्के
रेडी येथील माऊली विद्यामंदिर हायस्कूलमधून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला आहे. या हायस्कूलमधून सलोनी महेंद्र कांबळी हिने ८६.२० टक्के गुण मिळवून प्रथम, दिप्ती रामचंद्र सावंत हिने ८४ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर सानिका अर्जुन कृष्णाजी हिने ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
रा.धो.खानोलकर मठ हायस्कूलचा निकाल १०० टक्के
रा. धो. खानोलकर हायस्कूल मठचा निकाल १०० टक्के लागला आहे. या हायस्कूलमधून ९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. या हायस्कूलमधून रश्मी मधुकर भगत ९२.६० टक्के गुण मिळवून प्रथम, सोहम सतिश गावडे याने ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर विठ्ठल मधुकर गावडे याने ८०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
श्री देवी सातेरी हायस्कूलचा निकाल ९८.८३ टक्के
श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेमधून ८६ पैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.८३ टक्के लागला. या हायस्कूलमधून साईश संदिप केरकर याने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम, राजेश सचिन नाईक याने ९४.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर गौतमी महादेव आरोलकर हिने ९४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
अणसुर-पाल हायस्कूलचा निकाल १०० टक्के
अणसुर-पाल हायस्कूलमधून २१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. साहिल दिपक गावडे याने ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम, धनश्री सुनिल गावडे हिने ८८.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर लक्ष्मी अंकुश तेंडोलकर ८५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
दाभोली हायस्कूलचा निकाल १०० टक्के
दाभोली हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातून २२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तनया संजय बोवलेकर हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम, हेरंब सुधिर गोलतकर याने ८५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर अनुष विवेक परब याने ८१.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळे निकाल ९७.५० टक्के
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळेमधून ४० पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.५० टक्के लागला. विद्यालयातून दर्शन सुंदर सामंत याने ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम, नुतन रमेश आमडोसकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, शोभा केशव मुंडये हिने ९३.२० टक्के गुण मिळवून तृतीय, नम्रता चंद्रकांत गोसावी हिने ९२ टक्के गुण मिळवून चतुर्थ तर रूचि भरत राऊळ हिने ८८.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.
स. का. पाटील विद्यामंदिर केळुस निकाल १०० टक्के
स.का.पाटील विद्यामंदिर केळुसमधून बसलेले २१ ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला आहे. वेदिका मलजी राऊळ हिने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम, प्रज्ञा प्रमोद मडईकर हिने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय, विक्रांत रोहिदास नार्वेकर व चैतन्य नागेश केळुसकर यांनी ९१ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. दिक्षा धाकू कुंभार हिने ८७.२० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, तर संजना सहदेव मुणनकर ८३.६० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूलचा निकाल १०० टक्के
या विद्यालयातून ३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. समिक्षा सुनिल जाधव हिने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम, मनाली प्रकाश होडावडेकर हिने ९२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, मयूर दिपक नाईक व वैष्णवी संतोष धर्णे यांनी ८९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वेंगुर्ला हायस्कूलचा निकाल ९८.९१ टक्के
वेंगुर्ल हायस्कूलमधून ९२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९१ उत्तीर्ण झाले. हायस्कूलचा निकाल ९८.९१ टक्के लागला. हायस्कूलमधून रिया संदिप देसाई हिने ९८.८० टक्के गुण मिळवून प्रथम, सानिका दिपक पालव व विष्णू चंद्रकांत सावंत यांनी ९३.८० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर अथर्व प्रदिप गावडे याने ९२.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
आसोली हायस्कूलचा निकाल १०० टक्के
आसोली हायस्कूलमधून २२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल १०० टक्के लागला. या हायस्कूलमधून प्रणव सखाराम घाडी याने ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, संचाली नवसा गावडे हिने ९०.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर तन्मय सत्यवान कुडव याने ८८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूलचा १०० टक्के निकाल
या विद्यालयातून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातून गार्गी नागेश गावडे हिने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम, अथर्व महेश गावडे याने ९१.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर, वेदांत विनय आसोलकर याने ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाचा १०० टक्के निकाल
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलमधून बसलेले ४६ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला आहे. या रोशन विवेकानंद केळुसकर याने ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम, राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर हिने ९०.८० टक्के गुण मिळवून द्वितीय, साक्षी महेश तुळसकर हिने ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, नेहा बाबुराव साळगांवकर हिने ८९.६० टक्के गुण मिळवून चतुर्थ, स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हिने ८९.४० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला.