वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार...!

Edited by: दिपेश परब
Published on: May 02, 2024 14:27 PM
views 125  views

वेंगुर्ला : महाराष्‍ट्र राज्‍याचा ६५ वा स्‍थापना दिवस बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करुन साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वच्‍छता कर्मचारी उपस्थित होते. महाराष्‍ट्र  दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा व स्वच्‍छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत स्वच्‍छतेमध्‍ये उल्लेखनीय काम  करणा-या स्वच्‍छता कर्मचा-यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.  स्वच्‍छता कर्मचारी देवेंद्र जाधव, अनुज धामापूरकर, किशोरी तुळसकर व वाहनचालक सुहास परब यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

तसेच सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कर संकलनामध्‍ये उल्लेखनीय कामगिरी करणारे निशा आळवे, अभिजीत गिरप, मंदार चौकेकर व परशुराम नवार यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून सन्मान करण्‍यात आला.