वेंगुर्ले बेळगाव रस्ता रुंदीकरणाची मागणी..!

Edited by:
Published on: August 07, 2023 18:33 PM
views 174  views

सावंतवाडी : सह्याद्री घाट राज्य मार्ग १९० हा वेंगुर्ले बेळगाव रस्ता धवडकी फाट्यापासून सांगेली,‌सावरवड,कलंबिस्त,शिरशिंगे गोठवेवाडी हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक ये-जा करणे कठीण होत आहे रुंदीकरण झालेले नाही दुहेरी वाहतूकीसाठी हा रस्ता धोकादायक आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशा मागणीचे प्रस्ताव निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर व शाखा अभियंता विजय चव्हाण यांचे भेट घेऊन कलंबिस्त गावातील तरुणांच्या शिष्टमंडळाने केली आहे. हा सह्याद्री घाट मार्ग दुर्गम डोंगराळ भागातून जातो त्यामुळे या मार्गावर रुंदीकरण करण्यात येईल निश्चितपणे याबाबत लक्ष घातले जाईल असे आश्वासन यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

धवडकी ते कलंबिस्त शिरशिंगे हा जवळपास 15 ते 12 किलोमीटर अंतराचा मार्ग आहे सध्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक याचा होत आहे हा रस्ता नव्याने सह्याद्री घाट राज्यमार्ग म्हणून प्रस्तावित आहे हा पूर्वीचा रस्ता अरुंद आहे त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करताना मोठी वाहने एकाच वेळी समोरासमोरून आल्यास साईड मिळणे कठीण होत आहे या रस्त्या लगत साईड पट्टी नाही तसेच तेरे खोल नदीपात्र जात आहे त्यामुळे हा मार्ग अरुंद असल्याने अपघाताला निमंत्रण ठरत आहे. अरुंद रस्त्यामुळे व साईड पट्टी नसल्याने सतत अपघात होत असतात या भागात जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या आहे या मार्गावरून सावंतवाडी कडे ये जा करणाऱ्यांच्या वाहनांची संख्याही भरमसाठ आहे त्यामुळे हा रस्ता 24 तास वाहतुकी होत असते त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण होणे आवश्यक आहे प्रस्ताव देण्यात आला शिष्टमंडाने दिला यावेळी उपस्थित उपकार्यकारी अभियंता श्रीमती गोवेकर व श्री चव्हाण यांनी येत्या पावसानंतर निश्चितपणे हा मार्ग रुंदीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले सावंतवाडी.  वेंगुर्ले बेळगाव रस्ता कारिवडे पेडवे वाडी ते आंबोली या रस्त्यावर गेल्या महिन्याभरापूर्वीच कडी करून डांबरीकरण करण्यात आले आहे ते खडेकरन डावरे करणे पहिल्याच पावसात उकडून गेले आहे त्यामुळे या मार्गावरून टू व्हीलर वाहने चालवणे धोकादायक झाले आहे तसेच या रस्त्यावर पूर्णपणे ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे तरी सदर खडीकरण डांबरीकरण केलेल्या ठेकेदारावर कारवाई करून संबंधित रस्ता येत्या चतुर्थी पूर्वी सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असे शिष्टमंडाने स्पष्ट करतात. शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी २-३ दिवसात हॉट मिक्सिंग डांबर ओतून खड्डे बुजवले जातील. व पाऊस संपल्यानंतर सदर रस्त्यांच पूर्ण डांबरीकरण नविन करण्यात येईल असे स्पष्ट केले यावेळी श्री. संजय पालकर, माजी उपसरपंच नामदेव पास्ते, कलंबिस्त दुग्धविकास संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत, सुनील सावंत (गोट्या)  उपस्थित होते.