
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे काल रात्री ८ वाजता ट्रान्सफॉर्मर मध्ये मोठा बिघाड होऊन सुमारे २०० घरांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काल मातोंड व पेंडूर या दोन गावचा मोठा उत्सव म्हणजे घोडेमुख उत्सव होता यानिमित्त गावात अनेक भागातून पाहुणे दाखल झाले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तात्काळ विद्युत पुरवठा सुरू होण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. याबाबत विद्युत वितरण चे अभियंता अरविंद वनमोरे यांना ही माहिती मिळतात त्यांनी तात्काळ आरवली येथील किरण पालेकर यांच्या टीमच्या मदतीने ट्रांसफार्मर बदलला व रात्री ११ वाजताच्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यासाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू यांनी मदत केली. दरम्यान या कामगिरीबद्दल वीज वितरण चे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.










