परुळेत 'स्वस्थ नारी, सशक्त नारी' अंतर्गत आरोग्य शिबीर

Edited by: दिपेश परब
Published on: September 23, 2025 18:54 PM
views 97  views

वेंगुर्ला : तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर परुळे येथे २३ सप्टेंबर २०२५ रोजी "स्वस्थ नारी, सशक्त नारी" अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ डॉ. शलाका सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पवार, नेत्र तज्ञ डॉ. निळकंठ उपस्थीत होते. या शिबिराचा १०९ लाभार्त्यांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, डोळे तपासणी, एचबी, सीबीसी व इतर रक्त तपासणी, कर्करोग तपासणी, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, लहान मुलांची तपासणी, सर्वसाधारण तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.