
वेंगुर्ले : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ विरार मुंबई (बुवा- योगेश मेस्त्री) हे प्रदेशाध्यक्ष चषक २०२५ चे मानकरी ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख २१ हजार रुपये व प्रदेशाध्यक्ष चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, डोंबिवली येथील नामवंत भजन मंडळानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ओम नादब्राह्म भजन मंडळ सहाण अलिबाग-रायगड (बुवा - चेतन पाटील) यांनी द्वितीय क्रमांक तर महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, कुडाळ (बुवा -प्रसाद आमडोस्कर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी व तळेकरवाडी वायंगणी वेंगुर्ला (बुवा- अनिकेत भगत) याना उत्तेजनार्थ प्रथम, विष्णुस्मृती भजन सेवा संघ डोंबिवली (बुवा- नागेश सावंत) याना उत्तेजनार्थ द्वितीय तर दत्ताकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी (बुवा- विराज तांबे) यांना उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रोख १५ हजार, रोख ११ हजार, उत्तेजनार्थ रोख ७ हजार, रोख ५ हजार, रोख ३ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायक म्हणून बुवा योगेश मेस्त्री (लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ विरार मुंबई), सर्वोत्कृष्ट पखवाज वादक म्हणून प्रथमेश राणे (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी), सर्वोत्कृष्ट तबलावादक म्हणून अमन सातर्डेकर (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी), उत्कृष्ट कोरस म्हणून श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक कणकवली, उत्कृष्ट झांजवादक म्हणून आर्यन आईर (चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, वायंगणी), शिस्तबद्ध संघ म्हणून विष्णुस्मृती भजन सेवा संघ डोंबिवली, उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून राजेश नाईक (स्वराधारा भजन मंडळ तांबोळी), उत्कृष्ट गजर लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ विरार, उत्कृष्ट गौळण श्री बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळ पेझारी अलिबाग, उत्कृष्ट तबला- पखवाज जुगलबंदी ओम नादब्राह्म भजन मंडळ सहाण अलिबागचे विराज म्हात्रे व पार्थ म्हात्रे यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक सुधीर झांटये, पेंडूर सरपंच संतोष गावडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, संगीत तज्ञ जया गोरे, वैभव होडावडेकर, बाबा राऊळ, पोलीस पाटील सागर सावंत, वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ अध्यक्ष दिपेश परब, शेखर तुळसकर, पिंट्या राऊळ, परीक्षक प्रसिद्ध बुवा दिप्तेश मेस्त्री, मनिष तांबोस्कर, माजी सरपंच विजय रेडकर, संजय केणी, अजय नाईक, बंड्या होडावडेकर आदी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीच्या संपूर्ण स्पर्धेत तसेच बक्षिसवितरणाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले.










