
वेंगुर्ला : रविवार २१ सप्टेंबरला मध्यरात्री वेंगुर्ला चिपी, कालवंडवाडी येथे खाडीपात्रामध्ये तारकर्ली पुलाच्या शेजारी अवैद्य वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होडींवर वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस ठाणे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन उत्खनन करणाऱ्या बोटी जप्त करण्यात आलेले असून बोटीमध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू हस्तगत केली आहे. तर बोटीवरती काम करणारे परराज्यातील ७ कामगार यांना पोलीस स्टेशन, निवती यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
या कारवाईत परराज्यातील विर बहादूर संकर, विवेक बाबा, संतु बाबा, हिन्दू यादव, जितेंद्र सहा, ज्युव यादव, राजन बहर सर्व राहणार बहरिया, जिल्हा बलीया,राज्य उत्तरप्रदेश यांच्यावर निवती पोलीस स्थानकात पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत नायकोडे, गौतम सुतार, नामदेव मोरे, पोलीस हवालदार कदम, पोलीस ड्रायव्हर लोणे पोलीस पाटील संदेश पवार चिपी यांनी ही कारवाई केली.










