
वेंगुर्ला : स्वच्छता ही सेवा २०२५ अंतर्गत वेंगुर्ला पंचायत समितीच्या वतीने समुद्र किनारा लाभलेल्या ग्रामपंचायतींचा मदतीने तालुक्यातील १२ समुद्र किनाऱ्यावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वच्छता मोहीम अंतर्गत ग्रामपंचायत उभादांडा यांच्या सहकार्याने सागरेश्वर समुद्र किनारा येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी सहभाग घेतला.
जागतिक स्वच्छ सागर अभियान अंतर्गत सागरी किनाऱ्यावर ही स्वच्छता मोहीम व प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, तहसीलदार ओंकार ओतारी, उपमुख्यकार्यकरी अधिकारी अजिंक्य सावंत, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुदेश राणे, वेंगुर्ले गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, बँ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. विरेंद्र देसाई व विद्यार्थी तसेच प्राथमिक शाळा उभादांडा नं. १ चे विद्यार्थी, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागचे अधिकारी, कर्मचारी, उभादांडा पोलिस पाटील, महिला बचत गट, उपसरपंच कालेस्तिना आल्मेडा, सदस्य देवेंद्र भिसाजी डिचोलकर, नम्रता कुर्ले, अस्मिता मेस्त्री, निरंजन साळगांवकर, देवदत्त जुवलेकर, गणेश चेंदवणकर, गोविंद परुळेकर, मानसी साळगांवकर, बळीराम कुबल, अंकिता केरकर, तेजश्री कुबल, राधाकृष्ण पेडणेकर, राजश्री मर्ये, दिपाली नवार यांच्या सहित सुमारे ३५० विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.










