
वेंगुर्ले : भजन ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. ती जपून ठेवण्याचे काम कोकणाने नेहमी केलेले आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण ही कला जोपासतो आणि दिवसेंदिवस ही कला वृद्धिंगत होत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवावृद्धी कार्यक्रम जिल्ह्यात सुरू केले आहेत. त्याची सुरुवात वैभव होडावडेकर व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या तुळस येथील या राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेने होत आहे याचा आनंद आहे. भजन कलेबाबत सर्वांगीण अभ्यास करता यावा यासाठी कणकवली येथे खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून भजन सदन निर्मितीचे काम भाजपने हाती घेतले आहे. या माध्यमातून भाजप भजन कलेचे जतन करण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तुळस येथे बोलताना केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस येथे राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीपप्रजनाने झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष लखमराजे भोसले, महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य गुरुनाथ उर्फ राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हेमंत गावडे, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका महिला मोर्चा सरचिटणीस आकांशा परब, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, रेडी सरपंच रामसिंग राणे, पेंडुर सरपंच संतोष गावडे, प्रसिद्ध उद्योजक सुधीर झांटये, हितेश धुरी, प्रितम सावंत, संकेत धुरी, भूषण आंगचेकर, समीर कुडाळकर, राहुल गावडे, देवस्थान मानकरी बाळू राऊळ, बाबा राऊळ,पोलीस पाटील सागर सावंत, परीक्षक दिप्तेश मेस्त्री व मनिष तांबोसकर आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय भजन स्पर्धेतून येथील तरुणांना अनेक नवीन गोष्टी शिकता येणार : मनीष दळवी
तुळस गावाला भजन संस्कृतीची परंपरा आहे. येथील तरुण भजन संस्कृती चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील भजन कलाकारांकडून येथील तरुणांना अनेक नवीन गोष्टी शिकता येणार आहे, ही चांगली बाब आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वैभव होडावडेकर आणि त्यांचे सहकाऱ्यांनी घेतलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे चांगले आयोजन करण्यात आले असून त्यांना मी शुभेच्छा देत असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी लखम राजे भोसले यांनी ही मार्गदर्शन केले.
यावेळी तुळस माजी सरपंच शंकर घारे, तुळस माजी सरपंच विजय रेडकर, उद्योजक आनंद तांडेल, बूथ अध्यक्ष पिंट्या राऊळ, बूथ अध्यक्ष तेजस कुंभार, बूथ अध्यक्ष प्रमोद गोळम, आणि रामू परब, राजेश भणगे, बंड्या होडावडेकर, किशोर सावंत,सुनील परुळकर,सुनील कोरगावकर, प्रसाद घारे, रत्नाकर शिरोडकर, नितीन कोचरेकर, रुपेश कोचरेकर, समीर तांबोसकर,आनंद माळकर, सुधीर भगत, नारायण कुंभार, शुभम शेटकर,लौकिक परब,राहुल सावंत,सिद्धेश परब,राजेश तुळसकर, स्वप्नील होडावडेकर,शेखर तुळसकर,पुरुषोत्तम परब, वेदांत तांडेल,राकेश तांडेल,नामु तुळसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी व अजय नाईक यांनी केले तर वैभव होडावडेकर यांनी सर्वांचे आभार मानून उद्घाटन समारंभाची सांगता केली.










