
वेंगुर्ले : रेडी, म्हारतळेवारी येथील श्री देव ब्राह्नण नवरात्रौत्सव मंडळातर्फे यंदा नवरात्रौत्सवानिमित्त विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टो. या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असून दांडिया कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
२२ सप्टेंबर रोजी या नवरात्रौत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे युवा नेते विशाल परब, रेडीचे सरपंच रामसिंग राणे, प्रितेश राऊळ यांच्या उपस्थितीत रात्रौ ९ वा. होणार आहे. या नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रम होणार असून त्यात विविध स्पर्धा पाककला, पैठणी, फुगडीची जुगलबंदी, डबलबारी सामना, दांडिया, दशावतारी नाटक, गेम्स शो असे कार्यक्रम होणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी नंदकुमार मांजरेकर ९४२२३८१८४४, निलेश पांडजी ८२७५०२१७६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.