मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त अणसुरात १० वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: दिपेश परब
Published on: June 24, 2025 16:23 PM
views 49  views

वेंगुर्ले : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व अणसूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०२५ वर्षात १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव २३ जून रोजी अणसूर- पाल हायस्कुल मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वेंगुर्ला तालुक्याचे तहसीलदार ओंकार ओतारी उपस्थित होते. अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते तहसीलदार ओतारी तसेच भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यां चे स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसिलदार ओंकार ओतारी यांचा शाल, श्रीफळ देऊन आनंद जयवंत गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एसएससी मधील प्रथम, द्वितीय, तृतीय, व यशवंतराव भोसले महाविद्यालयात ८३.१८ % गुण प्राप्त प्रथम क्रमांक धनश्री कृष्णा गावडे यांचा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र सुपारीचे झाड देऊन गौवराविण्यात आले. त्यानंतर एसएससी उत्तीर्ण सर्व गुणवंत विदयार्थ्यांना सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते सन्मानपत्र, सुपारीचे झाड देऊन गौरविण्यात आले.

अणसूर पाल हायस्कुलने दरवर्षी १००% निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी शिक्षणावर भर देऊन उत्तम यशाचा मार्ग निवडून आईवडिलांचे ऋण सार्थकी लावण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच यावेळी आनंद जयवंत गावडे, शाळेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, कमलेश गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवसाच्या विध्यार्थ्यांना फळे वाटून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, आनंद जयवंत गावडे, मंगेश गावडे, प्रकाश गावडे, प्रभाकर गावडे, बूथ अध्यक्ष वामन गावडे, सुनील गावडे, दीपक गावडे, सुनील बापू गावडे, ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, संयमी गावडे आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना सरपंच सत्यविजय गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणे साहेबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मुलांना मार्गदर्शन केले तसेच सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य शाळेचे मुख्याध्यापक राजेश घाटवळकर व सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री ठाकर, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेश घाटवळकर यांनी केले.