
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार श्रेया मयेकर आणि प्रसाद गुरव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारादरम्यान मतदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे भाजपा चे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास श्रेया मयेकर यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या साथीने वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी उमेदवारांना कमळ चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप यांनी केले आहे. यावेळी वेंगुर्ला महिला मोर्चा प्रमुख सुजाता पडवळ, प्रभाग निरीक्षक अंकित घाऊसकर, संकेत धुरी, सुजाता देसाई, रसिका मटकर, हसीना बेगम मकानदार, शैलेश मयेकर,नीता मांजरेकर, रमेश नार्वेकर, शैलेश मयेकर तसेच शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.










