अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकू

संजय गावडेंचा इशारा
Edited by: दिपेश परब
Published on: November 11, 2025 15:55 PM
views 85  views

वेंगुर्ले : तालुक्यात सध्या बीएसएनएलची सेवा कोलमडली असून बीएसएनएल कार्ड वरून कुठेही फोन लागत नाही. फोन लागलाच तर एक अर्धा मिनिट बोलणे टिकत नाही. याकडे जाणून बुजून बीएसएनएल दुर्लक्ष करत असून लाखो ग्राहकांचे रिचार्ज मारून फोन वाया जात आहे. इंटरनेट सेवा ही बीएसएनएलची पूर्णपणे कोलमडली आहे. ही सेवा येत्या ७ दिवसाच्या आत व्यवस्थित न केल्यास वेंगुर्ला बीएसएनएल कार्यालयावरती मोर्चा नेऊन बीएसएनएल वेंगुर्ले कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांनी दिला आहे. 

वेंगुर्ला तालुक्यामध्ये असंख्य बीएसएनएलचे मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून गावागावात नवीन नवीन टॉवर माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार उभारले गेले आहेत. परंतु  तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कुठेही बीएसएनएलची सेवा व्यवस्थित मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही बीएसएनएल याची कोणती दखल घेत नाही असे लक्षात येत आहे. आणि जर का असेच चालू राहिले तर ग्राहकांमध्ये संतापाची लाड उसळून बीएसएनएल कार्यालयावरती मोर्चा न्यावा लागेल किंवा कार्यालयाला टाळ ठोकाव लागेल. अशा प्रकारची जनमानसात भावना निर्माण झाली असून याची दखल सात दिवसाच्या आत बीएसएनएल घेतली नाही तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा संजय गावडे यांनी दिला आहे.

न ग्रामीण भागामध्ये इतर कंपन्यांचे नेटवर्क नसल्यामुळे आणि इतर कंपन्या या आपल्या फायद्याचं बघत असून त्या ठिकाणी त्यांना इतर ग्राहक कमी प्रमाणात मिळत असल्याने या टॉवर कंपन्या याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत त्याचबरोबर बीएसएनएल कंपनी यांना खतपाणी घालत असून खाजगीकरण होण्यासाठी बीएसएनएल कंपनी सिंधुदुर्ग ही कार्यरत आहे का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. याबाबत जर का बीएसएनएल सिंधुदुर्ग आता दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या या इशाऱ्याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आता बीएसएनएल ग्राहक गप्प बसणार नाहीत. ज्या ज्या ठिकाणी पॉवर बॅक नसेल त्या ठिकाणी इन्वर्टर बॅटऱ्या यांची सोय करावी. यंत्रणेचे टॉवर नादुरुस्त झाले असतील तर त्या ठिकाणी लवकरात लवकर जास्त पावर चे टॉवर वरील इन्स्ट्रुमेंट ताबडतोब बसविण्यात यावेत आणि पुन्हा एकदा तालुक्यामध्ये बीएसएनएलची सेवा त्वरित सात दिवसाच्या आत कार्यान्वित करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.