शिरोड्यात नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

Edited by: दिपेश परब
Published on: September 29, 2025 15:15 PM
views 104  views

वेंगुर्ला : शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आज सोमवारी (२९ सप्टेबर) सकाळी  ९ ते दुपारी १ या वेळेत भारतीय जनता पार्टी शिरोडा,आरवली यांच्या कडून " सेवा पंधरवडा" निमित्त "नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान" अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजप तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी नेत्र तपासणी करणारे डाॅ.अक्षय नाईक, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. प्रशांत जाड, डाॅ.अक्षय विरगाळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर यांनी केले.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन डाॅक्टर यांचे स्वागत केले .या वेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नेत्ररोगाशी संबंधित लाखो गरजु रुग्णांना दिलासा मिळणार आहे . तसेच या शिबिरातील रुग्णांची मोफत नेत्र तपासणी , मोतीबिंदु शस्त्रक्रिया , औषधोपचार व मोफत चष्मेवाटप होणार आहे .

यावेळी मान्यवर म्हणून शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, तालुका कार्यकारणी सदस्य संतोष अणसूरकर, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, शिरोडा बूथ अध्यक्ष अभय बर्डे, सोमाकांत सावंत, चंद्रशेखर गोडकर, प्रसाद परब, माजी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य हेतल गावडे, जयमाला गावडे, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, भाजप शिरोडा शहर पदाधिकारी दत्ताराम फटजी, विदयाधर धानजी, दादा शेटये, अशोक परब, प्राजेश गावडे, शिरोडा महिला पदाधिकारी समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर, आरवली सरपंच तथा आरवली बूथ अध्यक्ष समीर कांबळी, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, आरवली बूथ अध्यक्ष मिलिंद साळगांवकर उपस्थित होते.