
वेंगुर्ले : वेंगुर्ले तुळस मार्गे सावंतवाडी मुख्य ररस्त्यावर तुळस घाटी येथे गोरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारी मोरी चे बांधकाम व रस्ता खचून गेलेला असून तिथून जाणाऱ्या वाहनांचे पुढील काळात अपघात होण्याची शक्यता आहे. हा मुख्य रस्ता खचून तब्बल दोन वर्षे होत आली तरीही बांधकाम विभाग यांनी याचे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे खचलेल्या रस्त्यांवर अपघात होऊन मोठी दुर्घटना झाल्यास याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे.
या सर्वाचा विचार करता तहसीलदार यांनी संबंधित विभागाला त्वरित आदेश देऊन खचलेल्या गोरेवाडी तुळस घाटी मुख्य रस्त्यांचे व पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांना दिले आहे.
यावेळी जिल्हा सचिव सुशील चमणकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, तालुका उपाध्यक्ष संतोष मातोंडकर, तालुका युवक अध्यक्ष गजानन कुंभार, ओबीसी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, तालुका चिटणीस संदीप सातार्डेकर, गोपाळ दळवी ,श्रीकृष्ण कोंडस्कर ,विजय सावंत आदी उपस्थित होते