
वेंगुर्ला : शिरोडा - केरवाडा येथील मच्छिमार सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा काशिनाथ नार्वेकर तर व्हा. चेअरमन पदी दिलीप नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
३० मे रोजी शिरोडा केरवाडा येथील मच्छिमार सहकारी सोसायटीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत मच्छिमार हितवर्धक सहकारी पॅनलचा एकतर्फी विजय झाला होता. दरम्यान आज चेअरमन व व्हा. चेअरमन यांची निवड करण्यात आली. चेअरमन पदी पुन्हा एकदा शिवसेना कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी दिलिप नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तातोबा चोपडेकर व रवी पेडणेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय अधिकारी प्रशांत साळगावकर व संचालक संजय उगवेकर, आत्माराम साळगावकर, पुंडलिक कुबल, प्रकाश नार्वेकर, नारायण लोणे, दिगंबर तांडेल, मयुरेश तारी, सारिका नाईक, शिल्पा चोपडेकर, अन्विता नार्वेकर, ग्रामस्थ सुनिल साळगावकर, बाबा नाईक, लक्ष्मण तांडेल, प्रथमेश बांदेकर आदी उपस्थित होते. दरम्यान चेअरमन व व्हा चेअरमन यांचे आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी अभिनंदन केले.