वेंगुर्ला युवासेना विभाग प्रमुख मितेश परब शिंदे गटात

मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश
Edited by: दीपेश परब
Published on: October 19, 2022 21:17 PM
views 130  views

वेंगुर्ले: आडेली जिल्हा परिषद मतदार संघ युवासेना विभाग प्रमुख मितेश परब यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

आमदार दीपक केसरकर यांनी भरघोस निधी मतदार संघाला देत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे यांचे विचार सत्यात उतरवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीपक केसरकर करत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे गट शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करत असून लवकरच अनेक युवा कार्यकर्ते कार्यकर्ते हे सुद्धा प्रवेश करतील, असे मत मितेश परब यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी सुनील डूबळे, बाळा दळवी, सचिन वालावलकर, दादा सारंग आदी उपस्थित होते.