
वेंगुर्ला : कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९८.३९ टक्के एवढा लागला आहे. वेंगुर्ला तालुक्यात ७४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १११ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३९७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.