वेंगुर्ला रोटरीच्या सर्जिकल तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: दिपेश परब
Published on: April 15, 2024 13:49 PM
views 53  views

वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत सर्जिकल १४ एप्रिल रोजी तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा सुमारे ४५ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये डॉ. अनिकेत वजराटकर व डॉ. मोनालीसा वजराटकर यांनी पाईल्स, भगेंदर, पित्ताशयातील खडे, हर्निया, अपेंडीक्स, स्त्रियांमधील स्तनातील गाठी इत्यादी आजाराच्या रुग्णांची तपासणी करून पुढील आवश्यक तेथे शस्त्रक्रिया तसेच इतर उपचारांसाठी रेफर केले.

  येथील डॉ. उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल येथे रो. डॉ. राजेश्वर उबाळे यांच्या इव्हेंट चेअरमनशिपखाली पार पडलेल्या या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन चे अध्यक्ष शंकर उर्फ राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रो सचिन वालावलकर, पंकज शिरसाट, डॉ आनंद बांदेकर, डॉ वसंतराव पाटोळे, ऍड प्रथमेश नाईक, सुनील रेडकर, आनंद बोवलेकर, दादा साळगांवकर, अनमोल गिरप आदी रोटरीयन उपस्थित होते.

    या शिबिरातून पुढील शस्त्रक्रिया रेफर केलेल्या पहिल्या १० शस्त्रक्रिया आपल्या मार्फत मोफत करण्यात येतील असे आश्वासन रो सचिन वालावलकर यांनी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत दिले. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रो डॉ आनंद बांदेकर व प्रास्ताविक अध्यक्ष राजू वजराटकर यांनी केले.