वेंगुर्ला : रेझिंग डे निमित्त वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या वतीने व बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला यांचे एनसीसी व एनएसएस पथक, वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने विविध उपक्रम घेण्यात आले.
यावेळी बॅ. खर्डेकर महाविद्यालय ते दाभोली नाका, शिरोडा नाका ते खर्डेकर कॉलेज अशी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबतची माहिती सांगून त्यांना वाहतुकीचे नियम व सुरक्षा तसेच सायबर फ्रॉड या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच डायल 112 बाबत माहिती सांगून अडचणीच्या वेळी सदर कार्य प्रणालीचा उपयोग कसा करता येईल याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या सहित ८ पोलीस अंमलदार, सुमारे ६० ते ७० विद्यार्थी, तसेच ३० पोलीस पाटील उपस्थित होते.