वेंगुर्ला पोलिसांची शहरात गणेशोत्सव काळातील वाहतूक नियोजनाबाबत जनजागृती...!

Edited by: दिपेश परब
Published on: September 16, 2023 17:36 PM
views 223  views

वेंगुर्ला : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने यानिमित्त वेंगुर्ला शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. या बाजारपेठ मध्ये तसेच इतर ठिकाणी नागरिकाना बिनदिक्कत खरेदी करता यावी तसेच वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी आज (१६ सप्टेंबर) वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत शहरात बाजारपेठ, हॉस्पिटल नाका, रामेश्वर मंदिर परिसर, कॅम्प परिसर, पिरचा दर्गा अशा विविध ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाबाबत जनजागृती करण्यात आली. 

यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी बाजारपेठतील दुकानदार, व्यापारी, फळे व फुले विक्रेते यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या. यावेळी हवालदार रमेश तावडे, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, गौरव परब, पोलीस बंटी सावंत, होमगार्ड केळुस्कर, वाडकर आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या रहदारीस अडथळा होईल असे कोणीही आपले वाहन उभे करू नये, ठरवून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावीत. कोणीही पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये असे केल्यास त्या व्यक्तीवर न्यायालयात कायदेशीर कारवाई केली जाईल असे वाहन यावेळी पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.