
वेंगुर्ले- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे ‘हर घर तिरंगा‘ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक विलास पडवळ व प्रथमेश गुरव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता विशाल होडावडेकर, लेखापाल अभिजित पाटील, माजी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, निशा आळवे, सहाय्यक कर निरिक्षक स्नेहल शिदे, लिपिक मंदार चौकेकर, प्रथमेश कसालकर, संदिप परूळेकर, विठ्ठल सोकटे, पंकज केळुसकर यांच्यासह अन्य नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.