मराठा मोर्चावरील लाठीचार्ज बाबत शासनाचा वेंगुर्ला मराठा समाजाकडून निषेध | तहसीलदारांना निवेदन

Edited by: दिपेश परब
Published on: September 05, 2023 19:35 PM
views 316  views

वेंगुर्ला : जालना येथे झालेल्या घटनेच्या संदर्भात शासनाच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज (६ सप्टेंबर) वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. 

यावेळी जालना येथे उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाटीचार्ज बाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठा समाज कमिटीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश परब, संजय गावडे, समन्वयक रवींद्र परब, तुळशीदास ठाकूर, योगेश कुबल, महिला प्रमुख प्रज्ञा परब, यशवंत उर्फ बाळू परब ,अजित राऊळ , विधाता सावंत, पप्पू परब, कृतिका कुबल ,अस्मिता राऊळ, रुपाली पाटील, कुमा ठाकूर ,संदीप परब , अल्पसंख्यांक वेंगुर्ले तालुकाप्रमुख रफिक बेग, आकांक्षा परब, उत्कर्षां परब, दिगंबर परब, प्रभाकर सावंत, दत्तगुरु परब, अभिजीत राणे, गौरव परब, विशाल गावडे, राजू शेटकर आदींसह तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ज्या पोलीस अधिकाऱ्याने लाठीचार्जचे आदेश दिले अशा अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात यावे. सादर मारहाणीची चौकशी पोलीस प्रशासनाकडून न करता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्फत करण्यात यावी. जखमी मराठा आंदोलकांना नुकसान भरपाई देऊन आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर ती चुकीची आहे. भविष्यात न्याय हक्कांसाठी भांडत असताना न्याय मिळाला नाही तर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल,असे यावेळी बोलताना सिद्धेश परब यांनी सांगितले.