
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील एकूण परीक्षेला बसलेल्या २७८ विद्यार्थ्यांपैकी २७६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा ९९.३० टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेची सारिकाकुमारी सरोज यादव ५५१ गुण (९१.८३ टक्के) गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली आहे. तर वाणिज्य शाखेतून मंगल प्रवीण शेणाई ५३१ गुण (८८.५० टक्के) मिळवून प्रथम, कला शाखेतून सानिका अमोल वरसकर हिने ५१२ गुण (८५.३३ टक्के) मिळवून प्रथम, किमान कौशल्य शाखेतून भाग्यश्री अविनाश केरकर हिने ४४३ गुण (७३.८३ टक्के) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
या महाविद्यालयातील कॉमर्स शाखेतून बसलेले ६१ ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम मंगल शेणई-५३१ (८८.५० टक्के), द्वितीय पूर्वा करंगुटकर-५२५ (८७.५० टक्के), तृतीय सानिका मांजरेकर-५१३ (८५.१३ टक्के), चतुर्थ लिलावती केळुसकर-५०६ (८४.३३ टक्के), पाचवा - विधी नाईक-४९६ (८२.६ टक्के), सायन्स शाखेतून बसलेले १२३ ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम सारिकाकुमार यादव-५५१ (९१.८३ टक्के), द्वितीय विदवत्ता वारंग-५३१ (८८.५० टक्के), तृतीय मिताली कोयंडे-५१९ (८६.५० टक्के), किमान कौशल्यमधून बसलेल्या ४६ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.८२ टक्के लागला. यात प्रथम भाग्यश्री केरकर-४४३ (७३.८३ टक्के), द्वितीय गौरेश पेडणेकर-४२९ (७१.५० टक्के), तृतीय सदानंद प्रभू-४२३ (७०.५०), कला शाखेतून बसलेले ४८ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.९२ टक्के लागला. यात प्रथम सानिका वरसकर-५१२ (८५.३३ टक्के), द्वितीय सानिका करंगुटकर-४९५ (८२.५० टक्के), तृतीय ईशा भोसले-४५७ (७६.१७ टक्के) यांनी गुण मिळविले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले आहे .