
वेंगुर्ला : तालुक्यातील उभादांडा सुखटणवाडी येथे चर्च कडील ६५ वर्षीय मिंगेलीन आगापी आल्मेडा यांनी आपल्या व्यवसाया करिता शेळी पालन केले होते. दिनांक ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बिबट्याने आल्मेडा यांचे ३ मोठे बकरे व दोन शेळ्या यांना ठार करून फस्त केल्या. त्यातील एक बकरा बांधलेला असल्याने त्यांना बिबट्याला तो नेता आला नाही. परंतु त्याला ठार केले. तर बाकी दोन बकरे व दोन शेळ्या वोडत रानात नेऊन फस्त केल्या. मिंगेलीन ही एकटी आपल्या घरात राहत असून मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी सावळा कांबळे, सूर्यकांत सावंत घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा, कुस्तान डिसोझा, रोबर्ट रोड्रिक्स, मॅक्सी लुद्रिक उपस्थित होते. बिबट्याच्या वावरने या भागात दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. मिंगेलीन ही वृद्ध महिला अत्यंत गरीब असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी वनविभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळून दयावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.