वेंगुर्लेत जोरदार आतषबाजी !

Edited by: दिपेश परब
Published on: January 10, 2024 15:07 PM
views 580  views

वेंगुर्ले : शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निकाल विधिमंडळात लागल्यानंतर वेंगुर्ले  शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. येथील पॉवर हाऊस येथे वेंगुर्ले शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून तसेच लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली. स्व बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

   यावेळी शहर प्रमुख उमेश येरम, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, महिला उपशहर प्रमुख मनाली परब, हर्षाली राऊळ, राजू परब, देविदास वालावलकर, प्रभाकर पडते, दिगंबर राणे, संजय परब व इतर शिवसैनिक उपस्थित होते.