सुरंगपाणीत प्रोक्षणविधी - विविध कार्यक्रम

Edited by: दिपेश परब
Published on: December 07, 2023 11:58 AM
views 89  views

वेंगुर्ला :  खानोली-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनातील विठ्ठल व दत्तमंदिराच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचा प्रक्षोणविधी हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे.

१९ रोजी दत्तमंदिर प्रक्षोणविधी, सायं.७ वा. स्वरसंगीत मंडळाचे (हरिचरणगिरी) भजन, दि.२० रोजी दत्तयाग, सायं.७ वा. चितामणी मंडळाचे (सुरंगपाणी) भजन, दि.२१ रोजी विठ्ठलमंदिर प्रोक्षणविधी, सायं.७ वा. सिद्धेश्वर मंडळाचे (कोंडुरा) भजन, दि.२२ रोजी विष्णूयाग, सायं.७ वा. महाविष्णू मंडळाचे (ओवेरे) भजन, दि.२३ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत कौशल मित्रमंडळ दाभोली यांचे दत्तनामस्मरण, सायं.७ वा. सातेरी मंडळाचे (सुरंगपाणी) भजन, दि.२४ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत कौशल मित्रमंडळ दाभोली यांचे दत्तनामस्मरण, सायं. ७ वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा ‘वत्सला हरण‘ नाट्यप्रयोग, दि.२५ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत कौशल मित्रमंडळ दाभोली यांचे दत्तनामस्मरण, सायं. ७ वा. स्वरसंगीत मंडळाचे (हरिचरणगिरी) भजन, दि.२६ रोजी दत्तजयंती दिवशी सकाळी पूजा, दुपारी आरती, तीर्थप्राद, नैवेद्य, सायं.६ वा. दत्तजन्मसमयी पुष्पवृष्टी, पालखी प्रदक्षिणा, भिक्षादान, आरती,

रात्रौ ७ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा ‘राजा हरिश्चंद्र‘ हा नाट्यप्रयोग, दि.२७ रोजी दुपारी पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद, सायं.७ वा. गावडेवंश तरूणहौशी नाट्य मंडळ गोवा यांचा ‘याजसाठी केला होता अट्टाहास‘ हा तीन अंकी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक प.पू.दादा पंडित यांनी केले आहे.