
वेंगुर्ले : वेंंगा फिटनेस फायटर ग्रुप हा चांगला क्लब येथे आहे. वेगवेगळे ग्रुप एकत्र येऊन इतकी चांगली ऍक्टिव्हिटी करतात हे पाहून खरंच आनंद झाला. शरीराच्या आजारांना बळी पडू नये म्हणून आपण दररोज काळजी घेतली पाहिजे व्यायाम असेल आहार असेल हे योग्य प्रकारे घेतले पाहिजे. व्यायाम व आहार याचा खूप मोठा रोल आहे. व्यायाम करणे किंवा फिटनेस दररोज शेड्युल असणे हे फार आवश्यक आहे. जिल्ह्याला किंवा इतर ठिकाण साठी एक आदर्शवत असा उपक्रम हा नक्कीच आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक नागरिकांची काळजी घेण्यासाठी इतका चांगले उपक्रम क्रम करता त्याबद्दल तुमचा मी खरोखरच अभिनंदन करते. असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी काढले.
वेंगा फिटनेस फायटर ग्रुप त्यांच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्त 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या नाईन बाय नाईन रन या उपक्रमाचा सांगता सोहळा रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले कॅम येथील बॅ. नाथ पै समुपदेशन केंद्र येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली व वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या उपक्रमात एकूण 475 जणांनी सहभाग घेतला होता यामध्ये विदेशात राहणाऱ्या भारतातील बारा जणांचा ऑनलाइन नोंदणीने सहभाग होता. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे बॅ. नाथ पै समुपदेशन केंद्रातर्फे डॉ. राजेश्वर उबाळे तर वेंगा फिटनेस फायटर ग्रुप तर्फे डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तेथे असलेल्या बॅ. नाथ पै यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
या उपक्रमात सहभाग घेतलेले ज्येष्ठ व्यक्ती सदानंद तावडे (73) व सतीश दीपनाईक (72) या दोन व्यक्तीचा जीवन गौरव पुरस्कार स्वरूपात सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या जीवन गौरव पुरस्कारा चे वाचन वेंगुर्ला हायस्कूलच्या शिक्षिका वीरश्री बिराजदार व अक्षरा नाईक यांनी केले. तर डॉक्टर शंतनू तेंडुलकर, डॉक्टर प्रफुल्ल आंबेडकर, डॉक्टर प्रशांत मडव, संतोष पेडणेकर मुंबईतून आलेले फ्रायडे फिटनेस चे सूर्या सर यांचा व्यंगा फिटनेस फायटर ग्रुपचे डॉक्टर प्रल्हाद मणचेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मोहन होडावडेकर यांनी या उपक्रमासाठी बहुमोल योगदान दिलेल्या दात्यांचा व वेंगुर्ली तहसीलदार ओंकार ओतारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या वेळी योग प्रशिक्षक साक्षी बोवलेकर व डॉक्टर स्नेहल गोवेकर यांनी योगातील फॉर्म रोलर चे प्रात्यक्षिक सादर करून ते नियमित करावे असे आवाहन केले. वेंगा फिटनेस फायटर ग्रुप तर्फे नाईन बाय नाईन रन या बारा दिवसांच्या रनिंग उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रांगणा रनर्स, व्हील्स ऑफ ब्युटी, रागिणी रनर्स, परुळा मॅरेथॉनचे सदस्य वेंगा फिटनेस फायटर ग्रुपचे सदस्य, यासह सिंधुदुर्गातील रनर नी सहभाग घेतला होता. तीन वर्षांपूर्वी वेंगुर्ले तालुक्यातून सुरू झालेल्या या उपक्रमास सुरुवातीस 84 गतवर्षी 216 तर चालू वर्षी 475 जणांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमासाठी सारस्वत बँक, वेंगुर्ला नगरपरिषद, संजीवनी हॉस्पिटल, एम पी टी कंपनी, प्रा. प्रदीप प्रभू, प्रा. अरविंद बिराजदार यांचे बहुमूल्य योगदान लाभले.
सदरचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेंगा फिटनेस फायटर ग्रुपचे सदस्य तसेच राम नाईक, प्राध्यापक अरविंद बिराजदार, प्राध्यापक एम आर नवत्रे, डॉक्टर राजेश्वर उबाळे, डॉक्टर सुबोध माधव, लाडू जाधव, विनिता सामंत, प्रीती कोळसुलकर, कविता भाटिया, शिवदास सावंत, भाऊ जाधव यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेंगा फिटनेस फायटर ग्रुपचे प्रमुख डॉक्टर प्रल्हाद मणचेकर यांनी, पाहुण्यांचे स्वागत महेंद्र मातोंडकर यांनी, सूत्रसंचालन प्रदीप वेंगुर्लेकर यांनी तर आभार डॉक्टर राजेश्वर उबाळे यांनी मानले.










