
वेंगुर्ले : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. आता या पदासाठी अनेकजण इच्छुक असून कोणाला संधी मिळते हे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान नगरसेवक पदांची आरक्षण सोडत बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे होणार आहे.
यापूर्वी वेंगुर्ले नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण होते त्यावेळी दिलीप उर्फ राजन गिरप निवडून आले होते. यानंतरच्या त्यांच्या काळात उत्तम काम पाहायला मिळाले. स्वच्छतेत अनेक पुरस्कार या कालावधीत नगरपरिषदेने पटकावले होते. आता हे आरक्षण बदलून सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे अनेक जण इच्छुक होणार आहेत. गणेशोत्सवा पासूनच नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी अनेक जुने नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नगरसेवक पदाच्या आरक्षणानंतरही अधिक चित्र स्पष्ट होणार आहे.










