
दोडामार्ग : जागतिक एडस दिनानिमित्त वेदांता कोक विभाग - वझरे आणि शासकीय रक्तपेढी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वझरे प्लांट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण २९ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
यावेळी सेसा कोकचे प्रमुख बाबाजी पागिरे , वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत, वेदांताचे सीएसआर हेड आशिष पिळणकर उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत वराडकर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल वेदांता कंपनी चे आभार मानले. तर आशिष पिळणकर यांनी वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिर आयोजित करणार असे नमूद केले.
सामाजिक उपक्रमांना नेहमीच हातभार लावणाऱ्या कंपनीचे कर्मचारी पवित्र अशा रक्तदान मोहिमेत सहभागी झाल्याने विशेष कौतुक होत आहे.