सण सौभाग्याचा...बंध अतूट नात्याचा

वेंगुर्ल्यात वटपौर्णिमा उत्साहात
Edited by: दिपेश परब
Published on: June 10, 2025 15:59 PM
views 231  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यासह ग्रामीण भागातील महिलांनी आज वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सुहासिनी महिलांनी वटवृक्षाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले. या सणाला पावसाने हजेरी लावली नसल्याने महिला वर्गामध्ये आनंदी वातावरण पहायला मिळाले.  

वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे आज मंगळवारी महिलांची वर्दळ दिसत होती. ब्राह्मणांच्या मंत्र घोषात महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. नविन लग्न झालेल्या नवदांपत्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यामुळे अशा नवदांपत्यांनी एकत्रित वटवृक्षाची पूजा केली. महिलांनी वडाला सुत गुंडाळून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना रानमेव्यांचे वाण देऊन शुभेच्छा दिल्या.