सावंतवाडी विठ्ठल मंदिरात वारकरी भजन - संगीत कार्यक्रम !

Edited by: विनायक गावस
Published on: June 23, 2023 11:01 AM
views 120  views

सावंतवाडी :  येथील विठ्ठल मंदिर मध्ये विठ्ठल रखुमाई हरिनाम विणा सप्ताह सुरू झाला असून रोज सायंकाळी ४ ते ६ वाजता महिला भजन तर रात्री ६ ते १० वाजता वारकरी भजन व संगीत कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

विठ्ठल मंदिर मध्ये शुक्रवार दि. २३ जून रोजी रघुकुल स्वर विहार प्रस्तुत संगीत सेवा सावंतवाडी चा सायंकाळी ७ वाजता तर सिद्धेश संगीत मंडळ सावंतवाडीचा ६ वाजता कार्यक्रम होईल.


शनिवार दि. २४ जून रोजी ह भ प श्री राणे वारकरी संप्रदाय मंडळ वेंगुर्ले यांचा ७ वाजता हरिपाठ, श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ उभा दंडा वेंगुर्ले यांच्या रात्री ९ वाजता कार्यक्रम. रविवार दि.२५ जून रोजी समीक्षा काकोडकर व प्रस्तुत अभंग रंग ७ वाजता तर नवार वारकरी भजन मंडळ चा कार्यक्रम १० वाजता, सोमवार दि.२६ जून रोजी मानकरी पुरस्कृत भजन सेवा ६ वाजता, मंगळवार दि. २७ जून रोजी हरिविणा सप्ताह सांगता व महाप्रसाद दुपारी २ वाजता होईल.


गुरुवार दि. २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त सायंकाळी ६ वाजता हभप प्रा.सौ. स्मिता प्रभाकर आजगावकर पुणे या संत कानोपात्रा चरित्र सांगतील तर सायंकाळी ६ वाजता शुक्रवार दि. ३० जून रोजी संत बोधले पाटील, शनिवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता संत सखु आख्यान, रविवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सौ विना विठ्ठल परब मालवण यांचे कीर्तन, सोमवार दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वासुदेव सडवेलकर बुवा यांचे काला कीर्तन, सकाळी १० वाजता पालखी विठ्ठल मंदिर भडवाडी कडून परत येईल असे विठ्ठल मंदिर कमिटी व विठ्ठल मंदिर सप्ताह उत्सव कमिटीने म्हटले आहे.