पोंभूर्लेत पाटगाव दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन

Edited by:
Published on: December 13, 2024 19:20 PM
views 126  views

देवगड : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील जागृत श्री. दत्त मंदिर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या मंदिरामध्ये दिनांक १४ डिसेंबर.रोजी मर्गशिर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तजयंती  चा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध धर्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

हा जत्रोत्सव शनिवार दिनांक १४ डिसेंबर पहाटे ५.वाजल्या पासून श्रीं वर विधिवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर या जत्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.त्यानंतर सायं.४ वा. देवगड चे प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर गोगटे यांचे कीर्तन, सायं ६ वां दत्त जन्मोत्सव, सायं.७ वा. स्थानिक भजने तसेच रात्रौ १२ वा.दत्त पालखी प्रदक्षिणा होऊन सोहळा सुरू होणार आहे.

 या दत्त मंदिर च्या दत्तजयंती उत्सवाला १२५ वर्षांचा इतिहास आहे.हे मंदिर देवगड तालुक्यातील विजयदुर्ग कोल्हापूर राज्य मार्गावर पोंभुर्ले -पाटगाव या ठिकाणी वसले आहे.श्री आशादत्त देवस्थान ट्रस्ट पोंभुर्ले - पाटगाव अध्यक्ष श्री.बाळकृष्ण अनंत वैद्य यांच्या आजोबांना सन १८०० च्या काळात या ठिकाणी श्री दत्त पादुका सापडल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना समज देऊन त्यांनी या ठिकाणी श्री दत्त मूर्तीची स्थापना करून घेतली व श्री दत्त जयंतीला जत्रोत्सवाची सुरुवात केली व आजपर्यंत हि परंपरा सुरू आहे.

१९५२ ते २०१२पर्यंत हे देवस्थान प्रशासनाच्या ताब्यात होते. त्यामुळे त्याठिकाणी साधेपणाने जत्रोत्सव होत असे २०१३ ट्रस्ट ला मान्यता मिळाल्या नंतर या ठिकाणी या उत्सवाला मोठ्या जेत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.व या यात्रोत्सवाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक भक्तांची मांदियाळी बघायला मिळते येथील श्री.आंबाबई मंदिराचा जीर्णोद्धार राचे काम पूर्ण करण्यात आले असून श्री दत्त मंदिर कलशरोहन व जीर्णोद्धार सोहळा २०२५ मध्ये मोठ्या उत्साहात करन्यात येणार आहे. या मंदिर परिसरातील मंदिराच्या दर्शनी बाजूला सुसज्ज असा देखणा आकर्षक सभामंडप आहे.श्री दत्त मंदिर देवालयाचा परिसर अतिशय सुंदर आहे.मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे.

या श्री दत्त मंदिरातील नित्य पूजा अर्चा पुजारी करतात या मंदिराच्या रंगरंगोटीचे काम बाकी असून.येथील उत्सव ग्रामस्थ मंडळी एकत्र मिळून साजरे करतात श्री दत्ता च्या कृपाशीर्वादामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे.त्यामुळे देवालयाच्या सौंदर्यांत अजूनच भर पडत आहे.