
वेंगुर्ले : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरोडा शाखेच्यावतीने श्री देवी माऊली सभागृह शिरोडा येथे उद्या २९ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.०० ते १२.०० पर्यंत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा लहान गट वय वर्ष १५ ते २० व मोठा गट वय वर्ष २० वर्षावरील या २ गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेत्या दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक ३०००/-, द्वितीय पारितोषिक २०००/-, तृतीय पारितोषिक १०००/- व उत्तेजनार्थ ५००/- रु देऊन गौरविण्यात येणार आहे.
जागर स्त्री शक्तीचा या ब्रीडवाक्या अंतर्गत दुपारी ३.०० ते ७.०० वाजेपर्यंत महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात विजेत्या प्रथम स्पर्धकास पैठणी, द्वितीय क्रमांकास सोन्याची नथ तर तृतीय विजेत्यास मोतीहार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी यात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेच्या वतीने करण्यात आले आहे.