
सावंतवाडी : येथील स्वराज्य संघटनेच्यावतीने १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मागे धर्मवीर संभाजी चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी अभिषेक, दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच सायंकाळी 5 वाजता बाईक रॅली व रात्री ठीक 8 वाजता कोकणातील पारंपारिक दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी तमाम शिवभक्त शिवप्रेमी यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करावे व कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी स्वराज्य संघटनेचे साईनाथ जामदार, ॲड. राजू कासकर, महेश पांचाळ, अजित सांगेलकर, श्रीपाद सावंत, संदीप धुरी, अंकित तेंडुलकर, प्रशांत ठाकूर, श्याम रेमुळकर, ज्योतिबा टपाले आदी उपस्थित होते.